इस्लामपूर शहराचा भौगोलिक विचार करता इस्लामपूर बसस्थानकावर विविध शहरातील एसटी बसेसची प्रमाणात सुरू असते. मात्र बसस्थानक आवार असुरक्षित बनला आहे. ऐन पावसाळ्यात बघेल तिकडे खड्डा आणि त्यात साचलेल्या पाण्याचा त्रास प्रवाशांना होत आहे. यातूनच अगोदरच लालपरीला पाणी भरलेल्या डबक्यातून मार्गस्थ होताना चालकांना तारेवरची कसरतच करावी लागते.आजारी असलेल्या पाहता सांगली मिरज, कुरूंदवाड, कवठेमहांकाळ यासह शिराळा तालुक्यातून मुंबई-पुण्याकडे जाणाऱ्या शिवशाही आणि लालपरी बसेसच्या पाहता बसस्थानकावर सुविधांचा अभाव आहे. बसस्थानकासाठी असलेली जागा नियोजनाअभावी स्थानकात मोठ्या प्रमाणात खड्डेही पडले आहेत.
तर याच खड्डयातील पाण्यात स्वच्छता गृहातील दुर्गंधीयुक्त पाणी मिसळते. त्यामुळे खड्डयातून बसेस मार्गस्थ होताना प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. बसस्थानक परिसरात मोठे होर्डिंग ठरताहेत धोकादायक इस्लामपूर बसस्थानकाच्या पश्चिमेस विविध व्यापारी संकुल आहेत. संरक्षक भिंतीच्या शेजारीच मोठे होर्डिंग लावलेली आहेत. परंतू ही होर्डिंग सध्या धोकेदायक ठरत आहेत. त्यातच भिंतीला लागून झाडे-झुडपे उगवल्याने परिसरात डासांचा उपद्रव वाढला आहे. याचा त्रास प्रवाशांसह चालकांनाही होतो. या परिसरामध्ये स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे.
या बसस्थानकामध्ये प्रवाशांची वर्दळ असते, याठिकाणी सोयी, सुविधा पुरवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.बसस्थानक हे सार्वजनिक ठिकाण असल्याने त्याठिकाणी प्रवाशांची ये-जा वाढतच असते. शाळाही सुरु झाल्याने प्रवेशासाठी पालक-विद्यार्थी आणि इतर प्रवाशांची संख्या बसस्थानकामध्ये अधिक प्रमाणात असते. याठिकाणी खड्डे जास्त प्रमाणात असल्याने प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे बसस्थानकातील खड्डे बुजवणे अत्यंत आवश्यक आहे.
इस्लामपूर बसस्थानकातील सर्व परिसर लवकरच काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्याचे टेंडरही मंजूर करण्यात आले आहे. जुलै महिनाअखेरपर्यंत त्याचे काम सुरुही होईल.त्यानंतर प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल पावसाळ्यात बसस्थानक आवारातील काँक्रिटीकरण झाल्यास प्रवाशांना सुखकर प्रवास करता येईल.