आष्टा तहसीलवर दलित महासंघातर्फे घंटानाद सुविधा द्या अन्यथा आंदोलन…

आष्टा (ता. वाळवा) येथील नागाव रस्त्यालगत राहणाऱ्या झोपडपट्टीतील कुटुंबांना तत्काळ नागरी सुविधा द्याव्यात या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने अप्पर तहसील कार्यालयासमोर घंटानाद मोर्चा व बेमुदत बोंब ठोक आंदोलन करण्यात आले राज्याध्यक्ष डॉ. सुधाकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली विविध मार्गावरून हे आंदोलन करण्यात आले.तहसीलदार राजशेखर लिंबारे, मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई, महावितरणचे अमित पाटणकर यांनी डॉ. सुधाकर वायदंडे व य शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा केली.

मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांनी दैनंदिन स्वछता, कचरा संकलन करण्यासाठी घंटागाडी, औषध फवारणी, नळ कनेक्शन तत्काळ करण्याबाबत लेखीपत्र दिले, तर महावितरणचे अमित पाटणकर यांनी वीज कनेक्शन देण्याबाबत आठ दिवसात कार्यवाही करण्याचे लेखीपत्र दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.सुधाकर वायदंडे म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे झाली; परंतु आजही काही कुटुंबांना राहण्यास घर, पाणी, वीज यासारख्या प्राथमिक सुविधा उपलब्ध होत नाहीत.