मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील यंत्रमागधारकांना अतिरिक्त वीजदर सवलत लागू करण्याच्या अनुषंगाने शासन अध्यादेशामध्ये असलेली ऑनलाइन नोंदणीची अट रद्द त्वरित करण्यासह सवलत त्वरित लागू करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. मात्र या निर्णयाची पूर्वलक्षी प्रभावाने १५ मार्चपासून अंमलबजावणी करण्याची मागणी आमदार रईस शेख व अबु आझमी यांनी केली आहे. याबाबतची माहिती समाजवादी पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रताप होगाडे यांनी दिली.
दरम्यान, आमदार शेख व आझमी यांनी यासंदर्भात अधिवेशनात लक्षवेधी सूचनाही दाखल केली होती. त्यावर याच दिवशी दिलेल्या उत्तरामध्ये वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकात पाटील यांनी ऑनलाइन नोंदणीची अट रद्द करण्यात येईल, असे उत्तर दिले आहे. ऑनलाइन नोंदणीची जाचक अट रद्द करून त्याऐवजी सद्यःस्थितीत यंत्रमागधारकांकडे असलेल्या स्वतंत्र वीज मीटरच्या आधारे ही अतिरिक्त वीज सवलत लागू करण्याची मागणी शेख, आझमी यांनी केली होती.