सध्या अनेक ठिकाणी गुन्हेगारीच्या प्रमाणात खूपच वाढ होऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक अवैद्य धंदे राजेरोसपणे सुरु आहेत. यात तरुणाई बळी पडत आहे. विटा शहरात हि प्रकरणे उघडकीस आल्याने विटा शहरात एकच भीती पसरली आहे. विटा शहरात कायदा, सुव्यवस्था अबाधित राहावी आणि शांतता राहावी, यासाठी विटा पोलिसांनी संपूर्ण विटा शहरातील प्रमुख मार्गावरून रूट मार्च काढला. उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या नेतृत्वाखाली विटा पोलिसांनी शहराच्या विविध भागातून संचलन केले.
विटा शहरात गेल्या काही दिवसात गांजा साठे आणि विक्रेते सापडणे, ड्रग कारखाना उघडकीस येणे, अशा गुन्ह्यांचा वाढता आलेख दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी संचलन केले. उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी धनंजय फडतरे यांचा नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी व होमगार्ड असे विटा शहर पोलीस ठाणे ते पायी चालत छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून या तासगाव रस्त्याने मुल्ला गल्लीतून आडव्या पेठेतून पाण्याची टाकी जवळून कराड रस्त्याने क्रांतीसिंह नाना पाटील हा यांचा पुतळा आणि तेथून मॉडर्न स्कूलमार्गे शकुन फिड्स पासून मायणी रस्त्यावरून जुन्या वनक्षेत्र अधिकारी कार्यालयापासून चौंडेश्वरी चौकातून सावरकरनगर चौकमार्गे खानापूर रस्त्याकडून एसटी स्टँड समोरून पुन्हा पोलीस ठाणे असे संचलन केले.
यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्यासह ५ पोलिस निरिक्षक, २० पोलीस अंमलदार, ३० होमगार्ड तसेच २ मोटार सायकल्स आणि ४ मोठी वाहने सहभागी झाले होते.