आषाढी एकादशीच्या काळात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. यावेळी सर्वसामान्य तासनतास उभे असताना व्हीआयपीच्या नावाखाली झटपट दर्शनासाठी मंदिर आणि दर्शन रांगेत घुसखोरी करीत असतात .यानंतर आता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हे व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद केले आहे . तसचं विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनरांगेत घुसखोरी करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात करण्यात आलीय.
आषाढी यात्रा काळात मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनरांगेत असताना काही मंडळी व्हीआयपीच्या नावाखाली झटपट दर्शनासाठी मंदिर आणि दर्शन रांगेत घुसखोरी करीत असतात .आवाज उठवल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हे व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद केले आहे. आता याचे पुढचे पाऊल टाकत प्रशासनाने अशी घुसखोरी रोखण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी पंढरपूर यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 दोन अन्वये प्रतिबंधात्मक आदेश दिनांक 11 जुलै रोजी पारित केला आहे.
