सकल हिंदू समाजातर्फे १९ जुलै रोजी कोल्हापूर बंदची हाक

विशाळगड हिंसाचार प्रकरणावरुन कोल्हापुरातील वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हं आहेत. कारण या हिंसाचाराविरोधात एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी कोल्हापुरात मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे.

पण याला सकल हिंदू समाजानं विरोध दर्शवला असून १९ जुलै रोजी कोल्हापूर बंदची हाक देण्याचा इशारा दिला आहे. विशाळगड हिंसाचारप्रकरणी इम्तियाज जलील यांनी कोल्हापुरात मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे.

मात्र, या मोर्चाला सकल हिंदू समाजानं कडाडून विरोध दर्शवला आहे. इम्तियाज जलील जर कोल्हापुरात आले तर त्यांचं कोल्हापुरी पायतानानं स्वागत करू तसंच या घटनेविरोधात एमआयएमनं कोल्हापुरात मोर्चा काढल्यास 19 जुलैला सकल हिंदू समाजाच्यावतीनं कोल्हापूर बंदची हाक देण्यात येईल, असा इशारा हिंदू एकता संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई यांनी दिला आहे.