इचलकरंजीत चोरट्यांचा किराणा दुकानावर डल्ला

 
इचलकरंजी, येथील कोल्हापूर नाका परिसरातील गीता एजन्सी नामक होलसेल किराणा दुकानाचे कुलूप तोडुन चोरट्यांनी गल्ल्यातील १ लाख ६० हजाराची रोकड लंपास केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी दुकानाजवळील तीन सीसीटीव्ही कॅमेरेही फोडल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी गोपीकिशन हरिनारायण तापडीया ( वय ४९ रा. कबनूर) यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

 याबाबत पोलिसांतून  मिळालेली माहिती अशी, कोल्हापूर नाका परिसरात धनंजय तापडीया यांचे गीता एजन्सी नामक किराणा दुकान आहे. या दुकानाचे आणि गोदामाचे भाडे देण्यासाठी तापडीया यांनी पिग्मीचे १ लाख ६० हजार रुपये काढून आणले होते. भाड्याच्या रक्कमेचा धनादेश देण्यासाठी याबाबत पोलिसांतून शुक्रवारी रक्कम बँकेत भरणार होते.

 मात्र, दिवसभर कामाच्या व्यस्ततेमुळे आणि बँकेला शनिवार व रविवारी सलग सुट्टीमुळे ती रक्कम दुकानातील गल्ल्यात ठेवली होती. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद केले होते. शनिवारी सकाळी तापडीया यांचे बंधु दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाची दोन्ही कुलूप नसल्याचे निदर्शनास आले. याबाबत माहिती समजताच पोलीसही दाखल झाले. दुकानाजवळील ३ सिसीटीव्ही कॅमेरे फोडले होते तर दुकानातील गल्ल्यातील १ लाख ६० हजार रुपये लंपास झाल्याचे स्पष्ट झाले. दुकान परिसरात पाहणी केली असता दोन दुकान गाळ्यांच्या मध्ये तोडलेली २ कुलुपे आणि कटावणी मिळून आली. पोलिसांनी दुकानातील सिसीटीव्हीचे फुटेज पाहिले असता रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास सुरुवातीला दोघा संशयीतांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडल्याचे त्यात कैद झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.