हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील प्रमुख दहा रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्राम सड़क योजनेतून ५९ कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. सातत्याने पाठपुरावा करून भरीव निधी मिळावा यासाठी प्रयत्न केले होते, अशी माहिती आमदार राजू आवळे यांनी दिली.
गेल्या साडेचार वर्षांत मतदारसंघातील रस्ते विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. त्यामुळे इतर जिल्हा मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग या रस्त्यांच्या कामांचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यात यश आले. रस्त्यांची कामे मजबूत, दर्जेदार झाली आहेत. दळणवळणाची सोय उत्तम झाल्याने प्रवाशांचा प्रवास न सुखकर झाला आहे. वरील दहा रस्त्यांना निधीची गरज होती. या परिसरातील ग्रामस्थांनी रस्त्यासाठी निधी मिळावा यासाठी मागणी केली होती. त्यानुसार पाठपुरावा केला.त्यामुळे इतर जिल्हा मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग, राज्य मार्ग असलेल्या खालील रस्त्यांसाठी ५९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
रुकडी ते रुई रस्ता (८ कोटी ७८ लाख), माणगाव रस्ता (५ कोटी ७३ लाख), वाठार तर्फ उद्गाव ते कुंभोज (६ कोटी २८ लाख), रुई ते साजणी रस्ता (५ कोटी ५१ लाख), कुंभोज- दुर्गेवाडी ते दानोळी रस्ता (५ कोटी ६२ लाख), कुंभोज ते बाबुजमाल दर्गा रा (३ कोटी ५१ लाख), वडगाव ते म्हसोबा देवालय ते किणी रस्ता ४ कोटी ४५ लाख), नरंदे ते खोची रस्ता (८ कोटी १४ लाख), खोची ते नरंदे (७ कोटी ४० लाख), पट्टण कोडोली ते तळंदगे रस्ता (४ कोटी ५१ लाख).