उरुण-इस्लामपूर शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे प्रतिक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील बस स्थानक व परिसरात प्रतिक स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून बसस्थानक पाण्याने धुवून काढत प्रवेशद्वाराकडील परिसराची साफ सफाई केली.सध्या समाजात सार्वजनिक स्थळांची फारशी काळजी न घेण्याची मानसिकता दिसते. त्यामुळे नागरिक व प्रवाशांना दुरवस्था व दुर्गंधीला सामोरे जावे लागते. हे टाळण्यासाठी युवक राष्ट्रवादीने प्रामाणिकपणे हा उपक्रम राबविला.
या उपक्रमाची सुरुवात माजी नगराध्यक्ष चिमण डांगे, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी सभापती खंडेराव जाधव यांच्या हस्ते झाली. आगार प्रमुख दिलीप ठोंबरे, वाहतूक नियंत्रक मिलिंद कुंभार व दिपक यादव, युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिग्विजय पाटील, उपाध्यक्ष अभिजीत कुर्लेकर, अभिजीत रासकर, सागर पोद्दार, श्रेयस माळी, अभिजीत साळुंखे, राज पाटील, प्रशांत यमगर, व्यंकटेश राजपूत, सुरज रासकर, श्रेणिक घबक, हेमकिरण पाटील, रोहित पाटील, प्रल्हाद माळी, सागर आवटे, विनू पाटोळे, किशोर कांबळे, विश्वजीत शिंदे, रोहित नलावडे, अमर मासाळ, संतोष हुलवान, राजवर्धन पाटील, संदीप वळसे, कुलदीप पाटील, उमेश पाटील, अक्षय रजपूत, बिरा यमगर, तसेच सोशल मिडीयाचे शहराध्यक्ष अभिमन्यू क्षीरसागर, उदय माळी, सुहास पाटील, अकबर मुंडे, राहुल पवार उपस्थित होते.