इस्लामपुरात आ. पाटील नाट्यगृहात १८ ते २१ फेब्रुवारीपर्यंत बिझनेस एक्स्पो २०२५ चे आयोजन

इस्लामपूर बिझनेस फोरम च्या वतीने १८ से २१ फेब्रुवारीपर्यंत  बिझनेस एक्स्पो २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. इस्लामपूर शहर व परिसर तसेच वाळवा तालुक्यातील व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी मुंबई येथील बीएनआय हा आंतरराष्ट्रीय संघटनेच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर बिझनेस फोरम दरबनची स्थापना केली. कोरोना काळात ‘इस्लामपूर व्यावसायिकांना आयबीएफने आधार दिला. २०२३ ला प्रथमच आयोजन करण्यात आले. यामध्ये १०० व्यावसायिक सहभागी झाले होते. इस्लामपूर येथील आम. जयंत पाटील खुल्या नाट्यगृहात हे प्रदर्शन होणार आहे. इस्लामपूर बिझनेस फोरमचे संस्थापक प्रतीक पाटील, अध्यक्ष विकास राजमाने यांनी पत्रकार परिषदेत हि माहिती दिली