जखिनवाडी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यास प्रारंभ,११ वर्षापासूनची जपली परंपरा….

सध्या माघ महिना सुरु झालेला आहे. माघ वारी निमित्त गावागावांमधून पंढरपूर कडे रवाना झालेल्या आहेत. यावर्षीच्या माघ वारीसाठी खानापूर तालुक्यातील जखिनवाडी ते पंढरपूर या पायी दिंडी सोहळ्याची सोमवारी सुरुवात झाली. या दिंडी सोहळ्याचे हे ११ वे वर्ष आहे. सात दिवस चालणाऱ्या या दिंडी सोहळ्यामध्ये जखिनवाडी सह परिसरातील अनेक विठ्ठल भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. या सोहळ्यात भजन, अभंगामुळे वारीतील वातावरण भक्तीमय झाले होते.