सांगोला मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी….

सध्या राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. नेतेमंडळींची लगबग देखील सुरू झालेली आहे. तसेच अनेक मतदारसंघात उमेदवारीवरून तर्कवितर्क देखील लावण्यात येत आहेत. अशातच सांगोला विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांनी विकासाच्या जोरावर विधानसभा निवडणुकीत रणशिंग फुंकले आहे.

तसेच महायुतीचे घटक पक्षाचे दुसरे नेते म्हणजेच माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील हे देखील कंबर कसून संपूर्ण सांगोला मतदारसंघ गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने पिंजून काढत आहेत. तसेच दिवंगत आ. गणपतराव देशमुख यांचे दोन्ही नातू म्हणजेच डॉ. अनिकेत देशमुख व डॉ. बाबासाहेब देशमुख या दोन नेत्यात मात्र उमेदवारीवरून अजूनही एकमत न झाल्याने नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार? याबद्दल तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.

सध्या आमदार शहाजीबापू पाटील हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहेत. त्यांच्या विरोधात शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार दोन्ही डॉक्टरपैकी कोण असणार तसेच आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांना कार्यकर्त्यांनी आबा आता माघार नाही अशी साथ घातल्याने माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील विधानसभा निवडणूक लढवणार की नाही हे आगामी काळात दिसून येणार आहे.