मराठीचा आवाज घुमणार देशाच्या राजधानी…..

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे महाराष्ट्राचे एक खास वैशिष्ट्य आहे. मात्र यंदाचे 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तब्बल सात दशकांनंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत होणार आहे.त्यामुळे या संमेलनात मराठी भाषेला अभिजात दर्जा प्रदान केला जाणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

आगामी साहित्य संमेलनासाठी सात ठिकाणांहून निमंत्रणे प्राप्त झाली होती. साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने उमेदवारांना मुंबई, दिल्ली आणि इचलकरंजी या तीन ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन आमंत्रित केले. यानंतर स्थळ निवड समितीने आपला अहवाल साहित्य महामंडळ, मुंबई मराठी साहित्य संघ कार्यालयाला सादर करून आगामी 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.