राज्यातील 27 हॉर्स पॉवर खालील यंत्रमागधारकांना एक प्रति युनिट व 27 हॉर्स पॉवर वरील यंत्रमाग धारकांना 75 पैसे प्रति युनिट वीज बिलात अतिरिक्त सवलतीचे वेळोवेळी आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री, वस्त्रोद्योगमंत्री, खासदार, आमदार यांच्याकडून देण्यात आली. लोकसभा निवडणुकीदरम्यान असो किंवा अथवा नुकत्याच पावसाळी अधिवेशनात सुद्धा ऑनलाईन नोंदणी रद्द करून ही सवलत लागू करण्याचे आश्वासन दिले असताना देखील जुलै महिन्याच्या वापराचे बिल नुकतेच तयार झाले असून हे बिल महावितरण कंपनीच्या ऑनलाईन पोर्टलवर दिसत आहे.
या वीज बिलात अतिरिक्त सवलत लागू झालेली दिसत नाही. राज्य सरकारने वेळोवेळी आश्वासन देऊन सुद्धा यंत्रमाग धारकांना अद्यापही विविध सवलतीचा लाभ मिळाला नाही त्यामुळे संतप्त झालेल्या यंत्रमागधारकांनी आता मोर्चा काढण्याचे नियोजन सुरू केलेले आहे.