इस्लामपुरात सोमवारी ‘सखी मंच’तर्फे हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन……

इस्लामपुरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाना उस्फुर्त प्रतिसाद देखील मिळतो. सखी मंच इस्लामपूरतर्फे आणि पी. एन. जी ज्वेलर्स यांच्या विशेष सहकार्याने सोमवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी राजारामबापू पाटील नाट्यगृह इस्लामपूर येथे दुपारी १ वाजता हळदीकुंकू होणार आहे. या कार्यक्रमात सिनेतारका मृणाल कुलकर्णी यांचा नृत्याविष्कार आणि इस्लामपुरातील प्रसिद्ध डॉक्टर, उद्योजक, अधिकारी यांच्या सहकार्यातून उदय राजमाने निर्मित सरगम ग्रुप हमारा यांच्या मधुर गीतांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आलेले आहे.


संक्रांतीचे औचित्य साधून रथसप्तमीच्या मुहूर्ताअगोदर सखी मंच सदस्यांच्या खास आग्रहास्तव हळदीकुंकू व पी. एन. जी. ज्वेलर्सतर्फे वाण वाटप होणार आहे. पहिल्या दोन हजार सखींना हमखास वाण वाटप करण्यात येणार आहे. सर्व सखी सभासदांनी वेळेत उपस्थित राहावे. सर्व सखींनी कार्यक्रमास येताना लाल-पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येणे व २०२४चे ओळखपत्र सोबत घेऊन येणे, असे आवाहन संयोजिका प्रा. वैशाली पाटील यांनी केले आहे.