उद्या ७ ऑगस्टला मराठा आरक्षण शांतता रॅलीची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातून ….

पश्चिम महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यातील मनोज जरांगे यांच्या ‘मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीची ‘ सुरुवात सात ऑगस्टला सोलापूर येथून होत आहे. या शांतता रॅलीत पन्नास ते साठ हजार मराठा बांधव व त्यासोबतच अठरापगड जातीतील बांधव तसेच मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव सहभागी होणार असल्याची माहिती मोहोळ येथील मराठा समन्वयकांनी दिली. पश्चिम महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यातील मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली’ची सुरुवात ७ ऑगस्टला सोलापूर जिल्ह्यातून होत आहे.

या रॅलीत मोहोळ तालुक्यातून पन्नास ते साठ हजार मराठा समाजातील तरूण, वृद्ध व महिला सहभागी होतील. तसेच मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजासह अठरापगड जातीतील समाज बांधव या शांतता रॅलीत सहभागी होणार आहेत, अशी माहिती सकल मराठा समाज मोहोळ तालुका समन्वयक डॉ.प्रमोद पाटील ,ॲड श्रीरंग लाळे , महेश पवार संतोष पवार ,संतोष गायकवाड यांनी दिली.