इचलकरंजीतील जादूप्रेमी रसिकांसाठी जादूचे प्रयोग बघण्याची सुवर्णसंधी…..

इचलकरंजीतील जादू प्रेमी रसिकांसाठी वीन जादूचे प्रयोग बघण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. जवळपास ५ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर इचलकरंजी येथे जादूगार रघुवीर हा सहकुटुंब सहपरिवार एन्जॉय करू शकणारा शो होत आहे. होम मिनिस्टर, सुर नवा ध्यास नवा, कॉमेडी एक्सप्रेस, एबीपी माझा कट्टा, खाली डोकं वर पाय, आम्ही सारे खवय्ये, खुपते तिथे गुप्ते आणि चला हवा येऊ द्या वर गाजलेल्या जादू आणि परदेशातून आणलेले खास नवीन जादूचे प्रयोग बघण्याची सुवर्णसंधी इचलकरंजीतील जादू प्रेमी रसिकांसाठी जादूगार जितेंद्र रघुवीर यांच्या मायाजालातून मिळणार आहे.

यूरोप, सिंगापूर, अमेरिकेतून आणलेल्या नवीन जादूसह ९ फुटी जापनीज डायनोसोरही बघण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात शो पाहण्याची अनोखी संधी आहे. येथील ना.बा. घोरपडे नाट्यगृहात खास स्वातंत्र्य दिनानिमित्त गुरुवारी १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० वाजता कार्यक्रम होणार आहे.