नेर्ले ता. वाळवा येथे ग्रामपंचायतीने पाच टक्के निधीतून दिव्यांग बांधवांसह महिला भगिनींना सरपंच संजय पाटील यांच्या हस्ते सानुग्रह अनुदान वाटप केले.हा कार्यक्रम भैरवनाथ मंदिरामध्ये पार पडला. प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला १५०० रुपयांप्रमाणे ८२ लोकांना एकूण १ लाख २३ हजार रुपयांचा निधी त्यांच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी उपसरपंच मनीषा माने, महाराष्ट्र केसरी अप्पासाहेब कदम, दिलीप पाटील, हिरोजी पाटील, सुरेश पाटील, एकनाथ पाटील, अनिल साळुंखे, किरण पाटील, प्रकाश कदम, बबनराव पाटील, दिनकर मोकाशी, अजित जामदार, अभिजीत पाटील, मोहनसिंग राजपूत आदीसह दिव्यांग बंधू भगिनी, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.