कसबे डिग्रजमध्ये पारायण सोहळा सुरू

कसबे डिग्रज मिरज तालुक्यातील येथील वीरशैव लिंगायत शिवमंदिर येथे शनिवार १० ऑगस्टपासून अखंड शिवलीलामृत पारायण व शिवनाम सप्ताह सोहळा सुरू झाला. हा सप्ताह १७ ऑगस्टपर्यंत आहे. दररोज शिवमंदिरमध्ये पहाटे ५ ते ६ काकड आरती. सकाळी ६ ते ७ शिवअभिषेक सकाळी ७ ते ११ शिवलीलामृत पारायण व शिवनाम सप्ताह सुरू राहणार आहे. दुपारी १२ ते ४ महिला भजन सायंकाळी ५ ते ६ शिवनाम जप व शिवपाठ सायंकाळी ७ ते ९ शिवकथा व रात्रौ जागर असे धार्मिक कार्यक्रम आहेत.

व्यासपीठ चालक माहेश्वरमूर्ती श्री विश्वेश्वर जंगम महाराज आहेत. १७ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते ९ शिवलीलामृत ग्रंथ पारायण सांगता व काल्याचे कीर्तन दुपारी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. सोहळ्याचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कसबे डिग्रज वीरशैव लिंगायत समाजातील पदाधिकाऱ्यांनी केले आहे. कसबे डिग्रज येथे पारायणाची अनेक वर्षाची परंपरा असून यानिमित्ताने लोकांच्यात समाजप्रबोधन होते.