बांगलादेश मधील हिंदू अत्याचार प्रकरणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून 25 रोजी सांगलीमध्ये कडकडीत बंदची हाक दिली आहे. शिवप्रतिष्ठाननेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी ही बंदची हाक दिली आहे. या बंदसाठी 20 ऑगस्ट रोजी रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे भिडे यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात देखील अती कडकडीत बंद पाळण्याचं आवाहनही संभाजी भिडे यांनी केलं आहे. ते सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच बांगलादेशमधल्या हिंसाचार प्रकरणी केंद्र सरकारने कडक पावली उचलावीत अशी मागणी करत बांगलादेश बाबत सगळ्या पक्षांनी मतभेद बाजूला सारुन एक मताने उभे राहिले पाहिजे, असं संभाजी भिडे म्हणाले आहेत.
Related Posts
रोहित पाटील यांच्यापुढे आव्हान कोणाचे?
कवठेमहांकाळ सध्या विधानसभा रोहित पाटील निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. तासगाव- कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीसाठी माजी मंत्री आर. आर. पाटील…
तीन जिल्ह्यांना ‘महामार्ग’ नावाचे संकट उभे!
कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील ऊस, भाजीपाला, द्राक्षासह भाजीपाल्याच्या हिरवीगार सुपीक शेतीत सध्या ‘महामार्ग’ नावाचे संकट उभे ठाकले आहे.आधीच…
रक्तबंबाळ अवस्थेत कारमध्ये आढळला मृतदेह…..
कुरुंदवाड येथील नांदणी भैरववाडी रस्त्यावर गॅस एजन्सीच्या गोडावून जवळ असणाऱ्या सागर कोप्पे यांच्या शेताजवळ एका चार चाकी गाडीत अज्ञाताचा खून…