हातकणंगले तालुक्यात इसमाची रेल्वेखाली आत्महत्त्या

हातकणंगले तालुक्यातील हिंगणगाव येथील विनोद गणपती कोळी (क्या ४८) या इसमाने काल रात्री लक्ष्मी इंडस्ट्रीजच्या रस्ता जवळ असणाऱ्या रेल्वे रूळावर रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. मात्र ही आत्महत्त्या कोणाच्या हद्दीत घडली यावरुन हातकणंगले पोलीस आणि रेल्वे पोलिसांमध्ये वाद सुरु होता. त्यामुळे बराचवेळ मृतदेह जागेवरच पडून राहिला होता.

अखेर रेल्वे पोलीसांनी मृतदेह सीपीआर इस्पितळात उत्तरीय तपासणीसाठी पाठवून नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याने प्रकरणावर पडदा पडला. कोळी हे लक्ष्मी औद्योगिक वसाहतीत कॉन्ट्रक्टर म्हणून काम करीत होते. आत्महत्त्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे. घटनेची माहिती कळताच हातकणंगले पोलीस व रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहचले यांच्यामध्ये हद्दीवरून वाद सुरु होता