सध्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला प्रत्येक पक्षातून जोरदार तयारी देखील सुरू झालेली आहे. उमेदवार निवडताना चर्चा रंगत आहेत.अशातच इचलकरंजीच्या नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी स्वखर्चातून बोअर रिपेरी करून देण्याचे काम आमदार आवाडे यांनी हाती घेतले असून गेल्या पाच वर्षात त्यांना कोणताही बोअर बंद पडलेला दिसला नाही.
शहरांमध्ये कोणतीही विकास काम करायचे त्यांना आठवले नाही आणि आता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपल्या मुलाला निवडून आणण्यासाठी विकास कामे करत असल्याचे नाटक आमदार आवडे करत आहेत. असा आरोप माजी नगरसेवक सागर चाळके यांनी केला आहे.
इचलकरंजी शहराला मीच पाणी देणार म्हणणाऱ्या आमदार प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजीतील एकही प्रश्न सोडवलेला नाही नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी शहरांमध्ये जलकुंभ बांधण्याचा सपाटा लावलेला आहे. परंतु जल कुंभामध्ये पाणी आणणार कुठून? याचे उत्तर मात्र आमदार आवाडे देत नाहीत असे म्हणत पाच वर्षात कोणते प्रश्न आपण सोडवले आहेत याचा खुलासा आमने-सामने येऊन द्यावा असे आव्हान माजी नगरसेवक सागर चाळके यांनी केले आहे.