राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिलेल्या ए. वाय. पाटलांनी ठोकला विधानसभा निवडणुकीचा शड्डू……..

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर ए.वाय.पाटील कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे त्यांच्या मतदारसंघातील अन्य नेत्यांसह नागरिकाचंही लक्ष लागलं होतं.

त्यानंतर आता ए.वाय.पाटील यांनी महाविकास आघाडीत जाण्याचे संकेत दिले आहेत.भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई आणि महायुतीतील नेते, माजी आमदार के.पी.पाटील यांच्यामुळे उमेदवारी अडचणीत आल्यानंतर ए.वाय.पाटील (A.Y.Patil) यांनी महाविकास आघाडीकडे उमेदवारीची मागणी केली आहे. देसाई यांनी अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केली नाही.

मात्र, के पी पाटील यांनी महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांकडे उमेदवारीची मागणी केलेली आहे.गेल्या दहा वर्षांपासून मी विधानसभा निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत आहे. काही वेळा तडजोडी आणि नेत्यांच्या आग्रहामुळे मला थांबायची वेळ आली. मात्र यावेळी थांबणार नाही राधानगरीच्या लोकांच्या आग्रहास्तव मी ही विधानसभा निवडणूक लढवणार आहे.

लोकसभा निवडणुकीत सुरुवातीला मी भूमिका घेत महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. शाहू महाराज यांच्या विजयासाठी मी आणि सर्वांनीच प्रयत्न केले. महाविकास आघाडीने जो मला शब्द दिला आहे.

100 टक्के त्या शब्दाप्रमाणे ज्या पक्षाकडे जागा जाईल तिथून मला उमेदवारी देतील. महाविकास आघाडीतील कोल्हापूरचा एक आमदार हा विधानसभेत जाईल.’ असा विश्वास ए.वाय.पाटील (A.Y.Patil) यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.