गवार लागवड कशी करावी? संपूर्ण माहिती…….

गवार हे शेंगवर्गातील कोरडवाहू म्हणून पिक घेतल्यास त्याला खताची फारशी जरुरी भासत नाही. बागायती पिकास लागवडीपूर्वी ५० किलो नत्र व ६० किलो पालाश द्यावे. जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकास पाणी द्यावे. या पिकला पाणी माफक प्रमाणत लागते परंतु फुले आल्यापासून शेंगाचा बहार पूर्ण होइपर्यत नियमित पाणी द्यावे.

गवार लागवड कशी करावी?
१)गवार लागवड टोचून,फेकून पेरून या पद्धतीने लावतात
२)गवार हे पिक उन्हाळी व हिवाळी दोन्ही हगामात लावतात.
3)गवार लागवड जानेवारी,फेब्रुवारी महिन्यात करावी.
गवार हे पिक शेंगवर्गीय भाजीपिक आहे. महाराष्ट्रातील सर्व भागात हे पिक घेतले जाते राजस्थानसारख्या कमी पावसाच्या प्रदेशात हे पिक घेवून भरपूर पैसा कमवता येतो.

गवार लागवड जमीन कशी असावी?
हलक्या जमिनीत गवार झाडे खुरटी होवून लवकर शेंगा येतात.गाळाची जमीन असेल तर शेंगा उत्तम प्रतीच्या येतात खताची सुद्धा गरज जाणवत नाही.

गवारीवरील कीड व रोग
मावा आणि तुडतुडे : या किडीच्या नियंत्रणासाठी पिकावर डायमेथोएट ३० ईसीक १.५ मिली अथवा मोनोक्रोटोफॉस ३६ डब्ल्यूसी अथवा मिथिलडिमेटॉन २५ ईसी दोन मिली प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारावे.

भुरी : हा बुरशीजन्य रोग असून, पानाच्या दोन्ही बाजूवर कळपात डागांनी होऊन नंतर संपूर्ण पान पांढरे होतात. हा रोग खोड आणि शेंगावरही पसरतो. याच्या नियंत्रणासाठी ५० % ताम्रयुक्त औषध कॉपर ऑक्झीक्लोराईड २५ ग्रॅम दहा लिटर पाण्यात मिसळून आठ ते दहा दिवसांच्या अंतराने तीन ते चार फवारण्या कराव्यात.

गवार लागवड अंतर किती असावे?
पूर्वमशागत जमिनीची प्रत आणि हवामानानुसार दोन ओळीतील अंतर ४५ ते ६० सेंमी ठेवावे व झाडातील अंतर २० ते ३० सेंमी ठेवावे.

पावसाळी गवार लागवड कशी करावी ?
गवारीची पेरणी करण्यापूर्वी बी चांगले दोन-अडीच तास पाण्यात भिजवून ठेवावे. त्यानंतर सावलीत सुकवून मग पेरणी केल्यास उगवण अधिक होते. जमिनीला आधी पाणी देऊन वाफेवर आणून पेरणी केल्यासही त्याचे परिणाम चांगले निघतात. पेरणीनंतर थोडे पाणी द्यावे.

उन्हाळी गवार लागवड कशी करावी?
गवार हे उष्ण हवामानातील पीक असून, सरासरी १८ – ३० अंश सेल्सिअस तापमानास हे पीक उत्तम येते. गवारीची लागवड खरीप व उन्हाळी अशी दोन्ही हंगामात केली जाते. उन्हाळी पीक शेंग भाजीसाठी घेतात. दक्षिण महाराष्ट्रातील ज्या ठिकाणी तापमान ४० डिग्री सेल्सिअस पेक्षा अधिक आहे; अशा ठिकाणी गवार ‘बी’ उत्पादनात भरपूर वाव आहे.