शक्तिपीठ महामार्ग बाबत शासन दिशाभूल करत असून शासन फसवेगिरी करत आहे असा आरोप कोल्हापूर जिल्हा शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी केला. माणगाव येथे शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने आयोजित निषेध सभेप्रसंगी बोलत होते.सभेच्या अध्यक्षस्थानी साजणी सरपंच शिवाजी पाटील हे होते.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डिजीटल फोटो जवळ शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा या आशायाचे निवेदन ठेवण्याचा प्रयत्न शेतकरी करत होते. परंतू पोलीस प्रशासन फलक काढून घेताना झटापटीमध्ये फलक फाटला. आंदोलक गनिमी कावा करत भूमी अधिग्रहणाचे नोटीसा चे होळी केली. यामध्ये पोलिसांची तारांबळ उडाली. पोलीस नोटीस काढून घेण्याचा प्रयत्न करत असताना गोंधळ उडाला. उपस्थित शेतकऱ्यांनी शासन व शक्तिपीठ महामार्ग विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.