इंडिया आघाडीतून मदन कारंडे यांना संधी मिळावी, अश्या हालचाली सुरु आहेत.कागल, चंदगड आणि इचलकरंजी हे तीन विधनासभेचे मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी चिन्हावर लढवेल, अशा दृष्टीने जागा वाटपात हिस्सा मागितला जात आहे .राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी इचलकरंजी विधानसभा मतदार संघाकडे अधिक लक्ष द्यायला सुरुवात केली आहे.
एकंदरीत नंदाताई बाभुळकर, मदन कारंडे ही दोन नावे पक्षात आघाडीवर आहेत. ताईंनी प्रचाराला आरंभ केला आहे. तर दुसऱ्या बाजूला मदन कारंडे यांनी लोकसभा निवडणुकीतच विधानसभा निवडणुकीचा प्रचारला काही प्रमाणात सुरवात झाली आहे. दरम्यान, कारंडे यांचे नाव पक्षातून पुढे येत असल्याने प्रस्थापित नेते विचारात आहेत.