इचलकरंजीत बंदी आदेशाचा भंग करून वाढदिवस साजरा करणाऱ्यावर गुन्हा दाखल

सध्याच्या काळात गुन्हेगारी क्षेत्रात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना पसरल्याचे चित्र आहे. दिवसेंदिवस या गुन्हेगारी प्रमाणत वाढच होत राहत आहे. सार्वजनिक ठिकाणी बंदी आदेशाचा भंग करत केक कापून वाढदिवस साजरा करणारा टोळक्यावर गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.यामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह जर्मनी टोळीतील मोकातील चार संशयित आरोपींचा समावेश आहे. रुपेश पंडीत नरवाडे (वय 24, रा. दत्तनगर, कबनूर), गौरव वसंत मरडे (वय 24, रा. इचलकरंजी), ओमकार सुनिल धांतुडे (वय 22, रा.

गावभाग, इचलकरंजी) द्वारकाधीश खंडेलवाल (वय 25) अशी त्यांची नावे आहेत. रविवारी (ता.16) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास निरामय रिंग रोडवरील शांतीनिकेतन शाळेसमोर संशयित आरोपींनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमून टेबल लावून केक कापला. यामुळे नागरिकांच्या ये-जा आणि वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. पोलिस हवालदार अनिल बबन पाटील यांच्या फिर्यादीनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.