काही महिन्यांवरच विधानसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाची आपापली मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे. सभा, मेळावे आयोजित केले जात आहेत. आगामी विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विधानसभानिहाय जनसंवाद दौरा सुरु करण्यात आला आहे.
त्या अनुषंगाने खासदार श्रीकांत शिंदे हे आज मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी इचलकरंजीत येत आहेत. यावेळी ते सायंकाळी ६ वाजता महेश क्लब येथे इचलकरंजी व हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी दिली.
यामध्ये इचलकरंजीत मंगळवारी ४ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजता महेश क्लब याठिकाणी हातकणंगले व इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी, प्रमुख पदाधिकारी व कार्यकत्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ७.३० वाजता शिरोळ विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधतील.
