आमदार समाधान आवताडे यांचा सलगर बुद्रुक येथे मुक्काम! समस्यांचे करणार निवारण

वार रविवार रोजी आमदार समाधान अवताडे हे दोन दिवसाच्या गाव दौऱ्यासाठी सलगर बुद्रुक येथे दाखल झाले. गावात येताच गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.सध्या गावांमध्ये गणरायाचे आगमन झाले असल्याने गावात गणेश भक्तीचे वातावरण आहे.हे लक्षात घेऊन आमदार अवताडे यांनी गावातील वेगवेगळ्या गणेश मंडळांना भेटी दिल्या व गणरायाची आरती केली. त्यानंतर गावातील रस्ते,पाणी,वीज,शिक्षण,आरोग्य,महिला बचत गट,दूध अनुदान प्रश्न इत्यादी प्रश्नावर त्यांनी गावकऱ्यांची बाजू ऐकून घेतली.यासाठी प्रत्यक्षात त्या त्या ठिकाणी जाऊन सदरच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी अधिकाऱ्यांना ताकीद दिली.

पाण्यासाठी महिलांचा आक्रोश – गावात एन पावसाळ्यातही गेल्या महिनाभरापासून गावात पिण्यासाठी पाणी मिळत नाही म्हणून गावातील महिलांनी आमदारांकडे तक्रार केली असता आमदारांनी याबाबत गावचे ग्राम विकास अधिकारी यांना सूचना देऊन दोन ते तीन दिवसात गावातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून नाही दिले तर तुमची गाठ माझ्याशी आहे अशा स्वरूपात सूचना केल्या.
दरम्यान या दौऱ्यात आवताडे यांच्या सोबत जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप खांडेकर,सभापती सुधाकर मासाळ आदी मान्यवर उपस्थित होते, या ठिकाणी दिल्या भेटी- आमदार आवताडे यांनी शिंदे वस्ती,बनसोडे वस्ती,चौधरी वस्ती,पुकळे वस्ती,बौद्ध नगर,संगोलकर वस्ती,

टिक्के वस्ती,जिल्हा परिषद केंद्र शाळा,प्राथमिक आरोग्य केंद्र,धायगोंडे वस्ती,दूध संकलन केंद्र,आदी ठिकाणी भेटी देऊन नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.शिवाय अधिकाऱ्यांना सूचना करून नागरिकांनी उपस्थित केलेले विविध प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याच्या सूचना केल्या.