माननीय आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भगवत भक्त शारदादेवी साळुंखे पाटील घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास हमखास आकर्षक बक्षीस मिळणार आहे अशी माहिती डॉ. सौ. नेहा साळुंखे पाटील यांनी दिलेली आहे.
पर्यावरणपूरक गौरी गणपती, बेटी बचाओ बेटी पढाओ,व्यसनमुक्ती, सेल्फ डिफेन्स, महिला सक्षमीकरण, वीर जवान तुझे सलाम तसेच शक्ती पीठ सजावट या विषयावर स्पर्धकांनी आपल्या घरातील गौरी गणपती यांचा तीन फोटो तसेच तीन मिनिटांचा व्हिडिओ ८९९९७१३८७२ क्रमांकावर पाठवणे आवश्यक आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास पाच स्पर्धकांना पाच आकर्षक पैठणी मिळणार आहेत. तर द्वितीय क्रमांकाच्या दहा विजेत्या स्पर्धकांना दहा मिक्सर मिळणार आहेत. तृतीय क्रमांकाच्या 15 महिला स्पर्धकांना पंधरा कुकर मिळणार आहेत.
पाचव्या क्रमांकाच्या 25 विजेत्या स्पर्धकांना 25 हॉटस्पॉट मिळणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शुक्रवार 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच पूर्वी आपल्या घरातील गौरी गणपती सजावटीचे फोटो आणि व्हिडिओ वरील मोबाईल क्रमांकावर पाठवणे बंधनकारक आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिला स्पर्धकांना आकर्षक बक्षीस मिळणार असल्याने सांगोला तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने डॉ. सौ. नेहा साळुंखे पाटील यांनी केलेले आहे.