दलित संघटनांचा इस्लामपुरात अत्याचार प्रकरणी मोर्चा

सांगली जिल्ह्यामध्ये दलितांवरील अन्याय, अत्याचार आणि मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या निषेधार्थ सर्व दलित संघटना व पक्षांच्या वतीने १३ सप्टेंबरला उपविभागीय पोलिस कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती
दलित महासंघाचे उपाध्यक्ष शंकर महापुरे यांनी दिली.


सर्व दलित संघटनांच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार बैठकीत महापुरे म्हणाले, गेल्या आठ-दहा दिवसांमध्ये बहे, ऐतवडे खुर्द, कुंभारगाव, आंबेगाव गावांमधून मातंग समाजातील व्यक्तींवर अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या मोर्चाबाबतचे निवेदन पोलिस उपअधीक्षक कार्यालयात दिले आहे. यावेळी नंदकुमार नांगरे, डॉ. विजय चांदणे, संदीप पाटोळे, पिराजी थोरवडे, विकास बल्लाळ, सुधीर कांबळे, कबीर चव्हाण, सचिन जाधव उपस्थित होते.