बाबर गटाला खिंडार! हणमंत कदम यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

खानापूर तालुक्यातील कळंबी येथील युवानेते हणमंत गंगाराम कदम यांच्यासह बाबर गटाच्या कार्यकर्त्यांनी माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आ. गोपीचंद पडळकर आणि माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून युवानेते हणमंत कदम यांनी कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. आगामी विधानसभा निवडणुकीत ब्रह्मानंद पडळकर यांना आमदार करण्यासाठी ताकतीने प्रयत्न करणार असून कळंबी गावातून जास्तीत जास्त मताधिक्य देणार असल्याचे यावेळी प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी सांगितले.