इचलकरंजीत हद्दपार! चार जणांना अटक

हद्दपार असतानाही शहरात फिरताना रेकॉर्डवरील चार गुन्हेगार पोलिसांना मिळाले. याप्रकरणी गावभाग व शिवाजीनगर पोलिसांनी कारवाई करून चार जणांना अटक केली.गावभाग हद्दीतील सुंदर रमेश नेमिष्टे (वय २९, रा. जयभवानी शेळके गल्ली) विनायक गजानन कुंभार (वय २६, रा. लिंगणगुडी मंदिरासमोर) आणि शिवाजीनगर हद्दीतील आशादुल्ला हारुण जमादार (वय २६, रा. भोनेमाळ), आकाश आण्णाप्पा भिलुगडे (वय २६, रा. लिगाडे मळा) अशी त्यांची नावे आहेत.

गणेशोत्सव आणि ईदच्या पार्श्‍वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी इचलकरंजीतील तिन्ही पोलिस ठाणे हद्दीतील एकूण १४४ जणांना हद्दपार केले आहे. त्यांना १७ सप्टेंबरपर्यंत हातकणंगले तालुक्यातून हद्दपार केले आहे. तरीही यापैकी अनेकजण शहरात निदर्शनास येत आहेत.

पोलिस पथकाकडून वॉच ठेवून कारवाई केली जात आहे. गावभाग पोलिसांनी गुरुवारी (ता. १२) रात्री दोघांवर कारवाई केली. हद्दपार विनायक कुंभार हा रात्री आठ वाजण्याच्या सुमारास राणाप्रताप चौकात मिळून आला, तर सुंदर नेमिष्टे हा रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास जयभवानी व्यायाम मंडळ चौकात मिळून आला.

तसेच शिवाजीनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईत हद्दपार आकाश भिलुगडे, आशादुल्ला जमादार दोघे जवाहरनगर येथील भगतसिंग चौकात मिळून आले.