डिलिव्हरीच्या 9 दिवसांनंतर दीपिकाला रुग्णालयातून डिस्चार्ज, चिमुकल्या परीसह घरी परतले दीप-वीर

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून ती नवजात मुलगी आणि रणवीर सिंहसोबत घरी जाण्यासाठी रवाना झाली आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण आज म्हणजे रविवारी आपल्या लाडक्या मुलीसह रुग्णालयातून घराकडे रवाना झाली आहे. दीपिका पदुकोण नुकताच गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आता डिलिव्हरीच्या नऊ दिवसांनंतर अभिनेत्री दीपिका पदुकोणला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

त्यानंतर ती आपल्या चिमुकली परी आणि कुटुंबासह घराकडे रवाना झाली आहे, ज्याचे फोटो अलीकडेच सोशल मीडियावर समोर आले आहेत.अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh ) यांची गाडी हॉस्पिटलमधून बाहेर पडताना मीडियाच्या कॅमेऱ्यात दिसली. मुंबई रुग्णालयातून दीपिका आणि रणवीर त्यांच्या बाळासह घराकडे रवाना झाले आहेत.

रणवीर सिंहसोबत दीपिकाची सासू आणि सासरेही दीपिका आणि तिच्या छोट्या परीला घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. मात्र, हॉस्पिटलमधून बाहेर पडतानाच्या फोटोंमध्ये ना रणवीर आणि दीपिका दिसत होते ना घरातील इतर कुणी. त्यांची फक्त गाडी हॉस्पिटल बाहेर पडताना दिसली.

पापाराझींच्या काही फोटोमध्ये दीपिका पदुकोणचा बॉडीगार्ड जलाल कारमध्ये बसल्याचं दिसत आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने 8 सप्टेंबरला गोंडस मुलीला जन्म दिला. लग्नाच्या सहा वर्षांनंतर दीपिका आणि रणवीर आई-बाबा झाले आहेत. या जोडप्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. गणेशोत्सवात दीपिका आणि रणवीरच्या आयुष्यात लक्ष्मीचं आगमन झाल्याचं बोलत चाहत्यांनी चिमुकलीसह दीप-वीरवर शुभेच्छांचा पाऊस पाडला आहे.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी 2018 मध्ये  लग्न केलं. लग्नाच्या 6 वर्षानंतर हे जोडपे एका लाडक्या मुलीचे पालक झाले आहेत. दीपिकाच्या प्रसूतीपूर्वी अभिनेत्रीचे प्रेग्नेंसी फोटोशूटही समोर आले होते. ज्यामध्ये कपल खूपच गोड दिसत होते.