रुकडीत बसने पकडली आग! मोठी हानी टळली

कै. संभाजीराव माने युवक संघटना (बागडी गल्ली) या गणेशोत्सव मंडळाचा महाप्रसाद चालू असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मंडळांच्या कार्यकर्त्यांची गर्दी होती. कोल्हापूरहून माणगावच्या दिशेला जात असलेल्या बसने मेन रोड रूकडी येथे साईनाथ हॉस्पिटल जवळ आग पकडली. इंजिन मधून धूर आणि इंजिन जास्त गरम होत असल्याने ही बाब चालक आणि प्रवाशांच्या लक्षात आली. त्यावेळी सर्व प्रवासी खाली उतरल्याने कोणत्याही प्रकारची मानवी हानी झाली नसून बसचे नुकसान झाले आहे.

यावेळेला मंडळातील कार्यकर्ते व गावातील नागरिक धावून आले आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आग आटोक्यात आणून संबंधित बसला धक्का मारून मराठी शाळेच्या पटांगणावर पार्क करण्यात आली. या वेळेला साई सर्विसमध्ये असणारे अनिल बागडी यांनी इंजिनमधून निघणारे सर्व कनेक्शन कट केल्यामुळे मोठी हानी टळली.