विट्यातील कार्यक्रमाला सुहासभैया, अमोलदादा, शितलताई, सोनिया वहिनी यांनी हजेरी लावत जिंकली महिलांची मने

विट्यातील जय भवानी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील जंगी नियोजन करण्यात आले. सुप्रसिद्ध विधीज्ञ ॲड. विनोदराव गोसावी यांच्या नेतृत्वाखाली जय भवानी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने होम मिनिस्टर हा जबरदस्त कार्यक्रम पार पडला.

यावेळी घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना भरपूर बक्षीस देखील देण्यात आली. जय भवानी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. तर या कार्यक्रमादरम्यान परिसरातील महिलांनी देखील मनमुराद आनंद घेतल्याचे पाहायला मिळाले.

यावेळी डॉ. शितलताई बाबर आणि सोनिया वहिनी बाबर यांनी महिला वर्गासोबत संवाद साधला. तर या कार्यक्रमास युवानेते सुहासभैया बाबर आणि अमोलदादा बाबर यांनी देखील उपस्थिती दाखवली. एकूणच गणेशोत्सवाचे औचित्य साधून महिलांसाठी एक आगळावेगळा उपक्रम राबवून जय भवानी सांस्कृतिक मंडळाने महिलांची मने जिंकली असून त्यामध्ये परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.