खानापूर नगरपंचायतीच्या सभापती निवडी बिनविरोध…


खानापूर नगरपंचायतीच्या विविध विषय समित्यांच्या सभापतीं निवडी बिनविरोध पार पडल्या.
यामध्ये सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी सुनील प्रभाकर मंडले, पाणीपुरवठा व जल निस्सारण सभापतीपदी चंदना पांडुरंग भगत, स्वच्छता व आरोग्य समिती सभापतीपदी जयश्री स्वप्नील मंडले व महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सुवर्णा प्रल्हाद कांबळे यांची बिनविरोध निवड केली.
सोनाली यादव यांनी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून प्रांताधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल व मुख्याधिकारी सोनाली यादव यांनी काम पाहिले. या निवडणुका खानापूर नगरपंचायतीमध्ये घेण्यात आल्या. या निवडीनंतर सर्व सभापतींचा सत्कार झाला.यावेळी नगराध्यक्ष सुमन पाटील, माजी नगराध्यक्ष डॉ. उदयसिंह हजारे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे, शिवसेना खानापूर तालुकाप्रमुख दादा भगत, पांडुरंग डोंगरे, बलराज माने, रायसिंग मंडले, सुनील बाबर, रविकिरण हिंगमिरे उपस्थित होते..