हातकणंगले मतदारसंघातून डॉ. सुजित मिणचेकर यांना कामाला लागण्याचा माजी मंत्री भास्करराव जाधव यांचा सल्ला…

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला प्रत्येक पक्षातून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असलेली पाहायला मिळत आहे. अशातच अनेक सभा, मेळावे यावरती भर देखील दिला जात आहे. श्रीक्षेत्र कुंथुगिरी येथे डॉ. सुजित मिणचेकर फाउंडेशनच्या वतीने कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि या कार्यक्रमाला माजी मंत्री व शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय नेते भास्करराव जाधव यांची उपस्थिती होती.

यावेळी त्यांनी हातकणंगले मतदारसंघातील जनता शिवसेनेचे माजी आमदार सुजित मिणचेकर यांच्या पाठीशी आहे त्यामुळे हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यासाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आग्रह धरणार असून तीन महिन्यापूर्वीच त्यांना कामाला लागण्याचे स्पष्ट संकेत दिले असल्याची माहिती माजी मंत्री व शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय नेते भास्करराव जाधव यांनी या कार्यक्रमात दिली.

सुजित मिणचेकर तुम्ही आमदार व्हाल, जनतेने तसे ठरवले आहे. मीही पक्ष नेतृत्वाबरोबर बोलून घेणार आहे तुम्ही मैदानात उतरण्याची तयारी ठेवा आणि कामाला लागा असा थेट सल्ला देखील आमदार भास्करराव जाधव यांनी दिला आहे.