इस्लामपूरमध्ये भाजीपाला व्यापाऱ्यांचा पालिकेवर मोर्चा

शहरातील भाजीपाला मार्केटमधील सर्व व्यापाऱ्यांनी पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय बांधकाम करू नये , या मागणीसाठी सर्व व्यापाऱ्यांनी भाजप नेते विक्रम पाटील यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर मोर्चl काढला.

भाजीपाला मार्केटच्या चार माजली इमारतीचे काम सुरु झाल्यास या व्यवसायिकांवर बेकारीची वेळ येणार आहे याचवेळी आमदार सदाभाऊ खोत व राष्ट्रवादीचे नेते निशिकांत पाटील यांनी मध्यस्थी करत व्यापाऱ्यांची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी मान्य केल्याने भाजीपाला बाजाराच्या नव्या इमारतीच्या बांधकामाला मंगळवार पासून सुरुवात करण्याचा निर्णय मान्यता आला . यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार , वैभव पवार राष्ट्रवादीचे शाहजी पाटील सुभाष सूर्यवंशी ,शंकराव चव्हाण , अनिल पावणे , मानसिंग पाटील ,वसीम तांबोळी उपस्थित होते .

मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी व्यापाऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्यांना त्रास होणार नाही अश्या पद्धतीतीने इमारतीचे बांधकाम केले जाईल असे सांगितले .