इस्लामपुरात आजपासून राज्यस्तरीय सुवर्णचषक हॉकी स्पर्धेस सुरुवात, ३० जानेवारीला बक्षीस वितरण समारंभ

प्रत्येक भागात अनेक कारणांनी विविध कार्यक्रम घेतले जातात. कधी यात्रेनिमित्त तर कधी वाढदिवसानिमित्त अनेक स्पर्धा देखील घेतल्या जातात. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील पहावयास मिळतो. इस्लामपूर येथील निशिकांतदादा स्पोर्टस् फौंडेशनच्यावतीने आज सोमवार दि. २७ ते गुरुवार दि. ३० जानेवारी २०२५ या कालावधीत राज्यस्तरिय सुवर्ण चषक हॉकी स्पर्धा २०२५ चे इस्लामपूर येथील पोलीस परेड मैदानावर आयोजन केल्याची माहिती निशिकांतदादा स्पोर्टस् फौंडेशनचे संस्थापक अजित पाटील यांनी दिली.

अजित पाटील म्हणाले, इस्लामपुरातील २५० हून अधिक खेळाडू निशिकांतदादा स्पोर्टस् फौंडेशनच्या माध्यमातून हॉकीचा सराव करत आहेत. अनेक खेळाडू आर्मी, नेव्ही, पोलिस व प्रशासकीय सेवेत आहेत. या स्पर्धेत मुंबई शहर पोलिस, एस. आर. पी. एफ. पुणे, मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई, मराठा लाईट इन्फंट्री युनिट कोल्हापूर, महाराष्ट्र क्रीडा मंडळ कोल्हापूर, छावा स्पोर्टस् कोल्हापूर, कोल्हापूर रेंज पोलीस, सातारा जिल्हा हॉकी असोसिएशन फलटण, खालसा युथ क्लब नांदेड, वाय. एस. एस. सोलापूर, निशिकांतदादा स्पोर्ट्स अ व व असे संघ सहभागी होणार आहेत.

स्पर्धेचे उद्घाटन आज सोमवारी सकाळी ९ वाजता आ. सदाभाऊ खोत यांच्याहस्ते व हुतात्मा दूध संघाचे चेअरमन गौरव नायकवडी, इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, विक्रम पाटील, वैभव पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष केदार पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे, तालुकाध्यक्ष निवास पाटील, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रवीण माने, शहराध्यक्ष अशोक खोत, उपाध्यक्ष भास्कर मोरे, जिल्हा हॉकी असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. प्रा. जी. एस. पाटील, प्रांजली बँकेचे चेअरमन अक्षय पाटील, सयाजी जाधव उमेश जाधव या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत

तर बक्षीस वितरण गुरुवारी दि. ३० जानेवारीला सायंकाळी ७ वाजता आ. सत्यजित देशमुख यांच्या हस्ते भाजपाचे शिराळा विधानसभा निवडणूक प्रमुख सम्राट महाडिक, निशिकांत पाटील, तहसीलदार सचिन पाटील, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, पोलिस निरीक्षक संजय हारुगडे, जयवंत पाटील, संजय कोरे, एल. एन. शहा, वैभव पवार, अमित ओसवाल, शिवाजी पवार, भास्कर कदम, प्रविण माने, माजी नगरसेवक प्रदीप लोहार, मनसे शहराध्यक्ष सनी खराडे, भास्कर मोरे, राजेंद्र पवार, राजवर्धन पाटील, मानसिंग पाटील, प्रविण परिट या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यास ५१ हजार तर उपविजेत्या संघास ३१ हजार बक्षीस दिले जाणार आहे.