खानापूर आटपाडी मतदारसंघातील शिवसेनेच्या वाघाला भाळवणी गावातील नरसिंह ग्रुपने साथ दिलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हिमतीला भाळवणी गावातील अख्खा शिंदे मळा मदतीला धावून आलेला पाहायला मिळाला. भाळवणी येथील नरसिंह ग्रुपने सुहास भैया बाबर यांची डरकाळी फोडलेली आहे. वरदविनायक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल आनंदराव शिदे यांचा यावेळी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश झालेला आहे.
तसेच अमोल शिंदे यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल नरसिंह ग्रुप ने सत्कार सोहळा आयोजित केलेला होता. सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या हस्ते वरद विनायक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी भाळवणी गावातील अनेक कार्यकर्त्यांचा बाबर गटात जाहीर प्रवेश झाला