आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला प्रत्येक पक्षातून जोरदार हालचाली सुरू असलेल्या पाहायला मिळतच आहेत. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते आणि त्यानंतर निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार आहेत. अशातच आता उमेदवारांची विधानसभेसाठीची नावे जाहीर होणार आहेत. भारतीय जनता पार्टीच्या 50 आणि 55 उमेदवारांची विधानसभेसाठीची नावे ही दोन टप्प्यात जाहीर होणार आहेत.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील युवानेते डॉ. राहुल आवाडे यांचे नाव हे पहिल्या यादीत जाहीर होण्याची शक्यता आहे. राहुल आवाडे यांचे नाव बाकी दुसऱ्या यादीतून पहिल्या यादीत गेल्याचे समजत आहे. या यादीबरोबरच शिंदे गटाचे 40 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे 20 उमेदवार असण्याची शक्यता आहे.
दरम्यान दुसरी यादी जी जाहीर होणार आहे त्या यादीमध्ये शिरोळ विधानसभा मतदारसंघातून आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पाठिंबा जाहीर केल्याची चिन्हे आहेत.