खानापूर , स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून शासनाच्या महाराष्ट्र ऍग्रो सुरक्षा अभियान योजने अंतर्गत खानापूर नगर पंचायतीस अग्निशमन दलाच्या एक दोनचाकी व मोठ्या सहाचाकी गाड्या मिळाल्या आहेत. त्याचे लोकार्पण नुकतेच माजी जि . प. सद्यस्य सुहास नाना शिंदे , नगराध्यक्ष सुमनताई पाटील, उपनगराध्यक्ष सुवर्ण कांबळे, मुख्याधिकारी हजारे यांच्या उपस्थितीत आमदार सुहास बाबर यांच्याहस्ते, करण्यात आले.
यावेळी बोलताना ते म्हणाले, खानापूरचे नागरीकरण व विस्तारीकरण पाहता अग्निशमनची गाडी हा फार महत्वाचा घटक असून प्रथम विटा येथील अग्निशमन गाडीवर संपूर्ण भाग अवलंबून होता. आता खानापूर नागरपंचायतीला अग्निशमन गाडी मिळाल्यामुळे खानापूर व परिसरातील लोकांच्या दृष्टीने हि महत्वाची बाब आहे. तसेच लवकरच नगरपंचायत इमारतीसाठी शासनाकडून निधी आणून दिला जाईल. नागरपंचायतीस विकासाच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी यावेळी ग्वाही दिली. यावेळी सर्व नगरसेवक , नगरसेविका,शिवसेना तालुकाप्रमुख दादा भागात, डॉ. उदय हजारे , हर्षवर्धन माने, बबन माने, लालासाहेब पाटील, सुनिल मंडले , प्रल्हाद कांबळे , स्वप्नील मंडले प्रकाश जोशी,मिलिंद डोंगरेंसह मान्यवर उपस्थित होते.
