अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील शरद पवारांची भेट घेऊन जवळपास तासभर बंद खोली चर्चा केली. या भेटीमुळे वैभव पाटील विधानसभेच्या पार्श्वभूमीवर तुतारी हाती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटलांनी वडील माजी आमदार सदाशिव पाटील यांच्यासह सांगलीमध्ये शरद पवारांची भेट घेतली आहे. खानापूर-आटपाडी विधानसभा मतदार संघातून महायुतीतून अजित पवार गटाकडून वैभव पाटील हे इच्छुक आहेत, मात्र आटपाडी मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला जाणारा असल्याने वैभव पाटलांनी शरद पवारांच्या घेतलेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाली होती.
दरम्यान, वैभव पाटील यांनी ही भेट कौटुंबिक असल्याची स्पष्ट केले आहे. आपले आजोबा हणमंतराव पाटील आणि शरद पवारांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यातून आपण वडिलांसोबत शरद पवारांची भेट घेतल्याचं स्पष्ट करत अजित पवार राष्ट्रवादी गटामध्येच आपण राहणार असल्याचे सांगितले आहे.