भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या सहकार्याने शासनाच्या योजनांचा आष्टा शहरातील सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. शहरातील बांधकाम कामगार विना त्रास शासनाच्या मदतीचा लाभ मिळवून देणार आहोत ,असे प्रतिपादन भाजप युवा मोर्चाचे वाळवा तालुकाध्यक्ष प्रवीण माने यांनी केले आष्टा येथे भारतीय जनता पार्टीचे वतीने आयोजित बांधकाम कामगारांना सुरक्षा संच आणि संसार संच वाटप कार्यालयात ते बोलत होते. यावेळी ,प्रवीण माने म्हणाले बांधकाम कामगार योजनेअंतर्गत ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर नोंदणीकृत कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जातो. प्रास्ताविक आयोजन संदीप गायकवाड यांनी केले ,जयवंत खोत यांनी आभार मानले.
Related Posts
आष्ट्यातील रस्त्यांसाठी खासदार धैर्यशील माने यांचा निधी
आष्टा शहरातील विविध विकास कामांसाठी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. गणपती चौक, तेली गल्ली,…
आष्ट्यात आजपासून एकवीरा देवी महोत्सव
वाळवा तालुक्यातील आष्टा येथील श्री एकविरा देवी महोत्सवानिमित्त आज शनिवार ९ नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर अखेर विविध धार्मिक व सांस्कृतिक…
कारंदवाडी, कृष्णानगर पाणंद रस्त्याचा प्रश्न मार्गी ७२ लाखाचा निधी मंजूर
आष्टा भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केल्यानंतर कारंदवाडी गावातील शेतकऱ्यांचे पाणंद रस्त्याचा प्रश्न लागला असून…