शाळांना यंदा दिवाळीची १४ दिवस सुट्टी!

चालू शैक्षणिक वर्षातील पहिल्या सत्राची परीक्षा सध्या सुरु असून या परीक्षा २७ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहेत. २८ ऑक्टोबरपासून शाळांना तथा विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी लागेल.शालेय शिक्षण विभागाच्या कॅलेंडरनुसार ९ नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी आहे, पण १० नोव्हेंबरला रविवार असल्याने सर्व शाळा ११ नोव्हेंबरपासून सुरु होतील. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना तथा शाळांना १४ दिवस दिवाळीची सुट्टी असणार आहे.

प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी चालू शैक्षणिक वर्षाच्या नियोजनाप्रमाणे २७ ऑक्टोबरपूर्वी पहिल्या सत्राची परीक्षा संपविण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या अनेक शाळांच्या परीक्षा सुरु झाल्या असून काही शाळांच्या परीक्षा पुढील आठवड्यापासून सुरु होणार आहेत.दिवाळीपूर्वी होणाऱ्या पहिल्या सत्र परीक्षेपूर्वी शाळांनी विद्यार्थ्यांची पूर्वतयारी करून घेतली आहे.

सध्या तोंडी, प्रात्यक्षिक, सराव सुरु असून २५ ते २७ ऑक्टोबरपर्यंत सर्वच शाळांच्या पहिल्या सत्राच्या परीक्षा संपतील, असे नियोजन करण्यात आले आहे. दिवाळीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असल्याने अनेक शाळांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांच्या पालकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे.