आळते, लक्ष्मीवाडी व बिरदेवाडी येथील दोन कोटी पंधरा लाख खर्चाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण करण्यात आला. यावेळी स्वागत प्रास्ताविकात सरपंच अजिंक्य इंगवले यांनी आळते सह परिसरातील अन्य गावातील विकास कामांचा आढावा घेतला. माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणराव इंगवले यांनी सांगितले पुढील चार महिन्यात मराठा मंडळाच्या सभागृहाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. मागील पाच वर्षात आळते पंचक्रोशीसाठी सर्वाधिक निधी आणून विकास कामे मोठ्या प्रमाणात केलेली आहेत.तरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराला विजयी करा.
आळते गावाने लोकसभा निवडणुकीमध्ये भक्कम साथ देऊन मताध्यक्ष दिले असून भविष्यकाळात आळते गावातील मराठा भवनसाठी लागेल तितका निधी दिला जाईल तसेच मराठा भवनचे उद्घाटन हे महायुतीच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच होईल अशी ग्वाही खासदार धैर्यशील माने यांनी दिली.