राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा बुधवारी इस्लामपूरमध्ये पोहोचली. या यात्रेची सांगता सभाप्रसंगी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा गेल्या 24 दिवसांपासून सुरू आहे.काल इस्लामपूरमध्ये या यात्रेची सांगता सभा झाली. इस्लामपूर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या सभेला महत्त्व प्राप्त झाले होते. विधानसभेसाठी महाविकास आघाडीचे पुढील आठवड्यात जागा वाटप जाहीर होणार असल्याची माहिती आहे.
अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.उमेदवारी ठरवण्याबाबतचा अंतिम निर्णय जयंत पाटील हे घेतील, असे शरद पवार यांनी गुरुवारी स्पष्ट केले.यावेळी त्यांनी जयंत पाटील यांच्याबाबत त्यांनी मोठ विधान केले होते.
जयंत पाटील यांनी उद्याचा महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी घ्यावी असं विधान शरद पवार यांनी केलंय. उद्याचा महाराष्ट्र सावरण्यासाठी आणि प्रगती घडवण्यासाठी मोलाची कामगिरी याच परिसरातून होणार आहे असं शरद पवारांनी सांगलीच्या सभेत जाहीर केलंय. त्यामुळे जयंत पाटील हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहेत का याची चर्चा आता सुरु झाली आहे.