खानापूर मतदारसंघात खळबळ! विश्वजीत कदम आणि सदाशिवराव पाटील यांच्यात गुप्तगु चर्चा

गेल्या अनेक दिवसापासून माजी आमदार सदाशिवराव पाटील व त्यांचे सुपुत्र वैभव पाटील हे कोणत्या पक्षात जाणार याची सर्वांना उत्सुकता असताना आज काँग्रेसचे नेते व माजी मंत्री विश्वजीत कदम आणि सदाशिवराव पाटील यांच्यात एका कार्यक्रमात गुप्तगु चर्चा झाली. स्व. प्रतापशेठ दादा साळुंखे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त पारे या गावात काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजीत कदम आणि माजी आमदार सदाशिवराव पाटील एकत्र आलेले होते. यावेळी त्यांनी काही वेळ एकमेकांच्या कानात चर्चा केली. ही चर्चा मात्र मतदारसंघात चांगलीच रंगलेली आहे

यावेळी या कार्यक्रमात विशेष म्हणजे वैभव पाटील यांनी देखील उपस्थिती लावलेली होती. विश्वजीत कदम आणि सदाशिवराव पाटील यांच्या या भेटीने मतदारसंघात खळबळ उडालेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सदाशिव पाटील व वैभव पाटील हे कोणत्या पक्षात जाणार आणि कुठल्या चिन्हावर निवडणूक लढवणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिलेली आहे.

काही दिवसातच ते आपली भूमिका स्पष्ट करतील असे सध्या बोलले जात आहे. तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवण्याची संकेत आहेत. परंतु याबाबतची भूमिका त्यांनी अद्यापही स्पष्ट केलेली नाही. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे संजय विभुते यांनी देखील आपली उमेदवारी मागितली आहे त्यामुळे या मतदारसंघात उमेदवारी वाटपाचा तिढा वाढलेला दिसून येत आहे. एकूणच आज झालेल्या सदाशिवराव पाटील आणि माजी मंत्री विश्वजीत कदम यांच्या या भेटीने मतदारसंघांमध्ये चर्चांना उधान आलेले आहे.