भाजप करणार करेक्ट कार्यक्रम! इस्लामपूरसह………

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून 4 दिवसात उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. सत्ताधारी महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. महायुतीमध्ये जागा वाटपांमध्ये काही जागांवर अदलाबदली करण्याबाबतही चर्चा सुरू आहे.भाजपने शरद पवारांना धक्का देण्यासाठी सांगलीत अजित पवारांना दोन जागा उमेदवारांसह देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.सूत्रांच्या माहितीनुसार, सांगलीत महाविकास आघाडीला लोकसभेत यश मिळाले. त्यानंतर आता आपल्या रणनीतिमध्ये भाजपने बदल केला असल्याचे दिसते.

भाजप सांगलीतील दोन जागा अजित पवारांना उमेदवारांसह देणार आहेत.भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला तासगाव आणि इस्लामपूर हे दोन विधानसभा मतदारसंघ अजित पवार गटाला देणार आहे. सध्या या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुमन पाटील आणि जयंत पाटील हे आमदार आहेत. शरद पवारांच्या उमेदवाराला धक्का देण्यासाठी भाजपही खेळी खेळणार आहे.

महायुतीच्या जागा वाटपात तासगाव आणि इस्लामपुर जागा अजित पवार गटाच्या कोट्यात जाणार आहेत. मात्र ह्या दोन्ही जागांवर भाजपचे आयते उमेदवार राष्ट्रवादी घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. तासगावमध्ये भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. तासगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे.